man with mask

कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घरी राहणं अनेकजण पसंत करत असले, तरी आता घरीेदेखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे घरी असाल, तरीही मास्क वापरण्याचा सल्ला निती आयोगाचे सदस्य पॉल व्ही. के. पॉल यांनी दिलाय. घरात एखादी असिम्पटमॅटिक व्यक्ती असेल, तर ती व्यक्ती कोरोना संसर्ग फैलावू शकते.

    देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलंय. भारतातल्या अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या ३ लाखांच्याही वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी घरी थांबणे, हाच सर्वोत्तम उपाय असल्याचं सांगण्यात येतं.

    कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घरी राहणं अनेकजण पसंत करत असले, तरी आता घरीेदेखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे घरी असाल, तरीही मास्क वापरण्याचा सल्ला निती आयोगाचे सदस्य पॉल व्ही. के. पॉल यांनी दिलाय. घरात एखादी असिम्पटमॅटिक व्यक्ती असेल, तर ती व्यक्ती कोरोना संसर्ग फैलावू शकते. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला लक्षणं दिसत नाहीत, तोपर्यंत त्या  व्यक्तीची कोरोना चाचणी केली जात नाही. त्यामुळे लक्षणं दिसण्याअगोदरच ती व्यक्ती कुटुंबातील इतरांना कोरोनाचा संसर्ग देऊ शकते. या कारणामुळे घरातील सर्व सदस्यांनी मास्क वापरला, तर हे प्रकार होणार नाहीत, असं पॉल यांनी म्हटलंय.

    अनेकदा,कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली असते. मात्र त्या व्यक्तीला त्याची काहीच लक्षणं जाणवत नाहीत. मात्र लक्षणं जाणवली नाही, तरी ती व्यक्ती इतरांमध्ये कोरोनाचा विषाणू पसरवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. कुटुंबातील ज्या सदस्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल, त्यांना मात्र कोरोनाचा त्रास होऊ शकतो.

    कुटुंबात नेमका कुणाला कोरोना आहे, हे ओळखणे कठीण असते. त्यामुळे कुठलाही धोका न घेता, एकापेक्षा अधिक व्यक्ती जर घरात असतील, तर मास्क वापरणे हेच हिताचे असल्याचं सांगितलं जातंय.