रावसाहेब दानवेंना गेल्या वेळी घेराव घातला होता, आता घरात घुसून मार दिला पाहिजे, बच्चू कडूंची आक्रमक टीका

रावसाहेब दानवे यांना गेल्या वेळी घेराव घातला होता. मात्र यावेळी त्यांना घरात घुसून फटकावून काढलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलीय. रावसाहेब दानवेंच्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तान असल्याचं विधानावर त्यांनी जोरदार प्रहार केलाय. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना झालेत.

केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटताना दिसू लागले आहेत. काल (बुधवारी) भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला होता. यावर राज्यमंत्री बच्चू कडूंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

रावसाहेब दानवे यांना गेल्या वेळी घेराव घातला होता. मात्र यावेळी त्यांना घरात घुसून फटकावून काढलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलीय. रावसाहेब दानवेंच्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तान असल्याचं विधानावर त्यांनी जोरदार प्रहार केलाय. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना झालेत.

बच्चू कडू यांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे. यावेळी पत्रकारांनी त्यांना रावसाहेब दानवेंनी केलेल्या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे विधान केलंय. गेल्यावेळी शेतकऱ्यांच्या बाबतीत अपशब्द काढणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या घराभोवती आम्ही घेराव घातला होता. मात्र आता त्यांच्या घरात घुसून त्यांना फटके द्यायला हवेत, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय.

या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हं आहेत. पुढील काही दिवसांत या वादाला कुठलं रूप येतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.