काय सांगता! नीरव मोदीच्या बहिणीनं इंग्लंडमधील बँक खात्यातून भारत सरकारला पाठवले ‘इतके’ इतके कोटी

पंजाब नॅशनल बँक घोटाळा करुवून प्रकरणी नीरव मोदीची यापूर्वी, इग्लंडच्या न्यायालयाने भारतातील पळपुटा हिरा व्यापारी नीरव मोदीला मोठा झटका दिला आहे. यूके हायकोर्टाने २३ जूनला, नीरव मोदीने भारताकडे प्रत्यर्पण करण्याविरोधात केलेला अर्ज फेटाळून लावला आहे.

    नवी दिल्ली: भारतातील पळपुटा हिरा व्यापारी नीरव मोदीच्या बहीणीने आणि सरकारी साक्षीदार पूर्वीने (Purvi Modi) आपल्या इंग्लंडमधील बँक खात्यातील १७.२५ कोटी रुपये भारत सरकारला पाठवले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

    पंजाब नॅशनल बँक घोटाळा करुवून प्रकरणी नीरव मोदीची यापूर्वी, इग्लंडच्या न्यायालयाने भारतातील पळपुटा हिरा व्यापारी नीरव मोदीला मोठा झटका दिला आहे. यूके हायकोर्टाने २३ जूनला, नीरव मोदीने भारताकडे प्रत्यर्पण करण्याविरोधात केलेला अर्ज फेटाळून लावला आहे. महत्वाचे म्हणजे, इग्लंडच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी एप्रिल महिन्यात नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यर्पण करण्याचा आदेश दिला होता.