जगाला हादरा देणारा काय आहे ‘पेगासस स्पायवेअर’; नेमका धोका कुणाला?

पेगासस स्पायवेअर संबंधी धमाकेदार अहवालामुळे अवघ्या जगाला हादरा बसला आहे. जगातील५० देशांमधील सरकारांशी संबंधित पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांवर याद्वारे हेरगिरी केली जात असल्याचे त्यात म्हटलेले आहे.

  दिल्ली: इस्त्रायली फर्म एनएसओच्या लष्करी दर्जाच्या पेगासस स्पायवेअर संबंधी धमाकेदार अहवालामुळे अवघ्या जगाला हादरा बसला आहे. जगातील५० देशांमधील सरकारांशी संबंधित पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांवर याद्वारे हेरगिरी केली जात असल्याचे त्यात म्हटलेले आहे. भारतात केंद्र व महाराष्ट्रातही मागील काळात भाजप सरकारने याचा वापर केल्याचे आरोप होत आहेत.

  काय आहे पेगासस स्पायवेअर

  पेगासस हे एक मालवेयर आहे जे आयफोन आणि Android डिव्हाइसवर परिणाम करते. हे वापरकर्त्यांचा संदेश, फोटो आणि ईमेल कॅप्चर करण्यासह कॉल रेकॉर्ड करणे आणि मायक्रोफोन सक्रिय करण्यास अनुमती देत सर्व माहिती चोरते.

  वॉशिंग्टन पोस्टने केलेल्या दाव्यानुसार एनएसओ ग्रुपच्या ग्राहकांनी १८९ पत्रकार, ६०० हून अधिक राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांच्यासह ६० हून अधिक महत्वाच्या व्यावसायिकांना लक्ष्य केले आहे.

  पेगासस जवळजवळ संपूर्ण जगातील लोकांवर हेरगिरी करू शकते, त्याचे मुख्यालय इस्राईलमध्ये आहे

  याप्रकारचे डेटा एकत्र कारण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करणे चुकीचे नाही. परंतु या या तंत्रज्ञानाचा अयोग्य पद्धतीने वापर करत लोकांची खासगी माहिती त्यांच्या संमतीशिवाय हॅक करणे, सर्वांसाठीच घातक ठरेल.

  आगामी काळात १७ माध्यम संस्थांचे ८० हून अधिक पत्रकार याबाबत खळबळजनकदिल्ली खुलासे करतील. मग पुढे येईल की या बिग टेक कंपनीकडे जगभरातील नेमकी कोणती आणि किती रहस्ये आहेत?