सोशल मीडियाचा गैरवापर थांबवणे आणि महिलांच्या सुरक्षेची खात्री करणे याबाबत काय पावले उचलली? केंद्राचे ट्विटरला समन्स

गेल्या काही दिवसांपासून मायक्रो ब्लॉगिग प्लॅटफॉर्म ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये तणाव आहे. त्यात आता माहिती तंत्रज्ञानासंबंधी संसदीय स्थायी समितीने ट्विटरला समन्स बजावला असून 18 जूनला कंपनीच्या प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. समितीने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाही सध्या सुरू असलेल्या वादाबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. या समितीचे अध्यक्ष काँग्रेस नेते आणि तिरुवनंतपूरम खासदार शशी थरूर आहेत. ट्विटर अधिकाऱ्यांकडून 18 जूनला स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे.

    दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मायक्रो ब्लॉगिग प्लॅटफॉर्म ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये तणाव आहे. त्यात आता माहिती तंत्रज्ञानासंबंधी संसदीय स्थायी समितीने ट्विटरला समन्स बजावला असून 18 जूनला कंपनीच्या प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. समितीने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाही सध्या सुरू असलेल्या वादाबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. या समितीचे अध्यक्ष काँग्रेस नेते आणि तिरुवनंतपूरम खासदार शशी थरूर आहेत. ट्विटर अधिकाऱ्यांकडून 18 जूनला स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे.

    समिती-प्रतिनिधींमध्ये होणार चर्चा

    समिती सोशल मीडिया कंपन्यांशी चर्चा करणार आहे. समितीने नवीन आयटी नियम आणि याबाबत कंपन्यांनी केलेली प्रगती, तसेच फेरफार मीडिया वाद, दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाच्या अधिकाऱ्यांची केलेची चौकशी याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती संसदीय सूत्रांनी दिली आहे. माहितीनुसार, ट्विटर अधिकाऱ्यांचे म्हणणे समिती ऐकून घेईल. तसेच युजर्सचे अधिकार सुरक्षित करणे, सोशल मीडियाचा गैरवापर थांबवणे आणि महिलांच्या सुरक्षेची खात्री करणे याबाबत ट्विटरने काय पावले उचलली आहेत याबाबत विचारणा करणार आहे.

    हे सुद्धा वाचा