WhatsApp वापरणा-यांची प्रायव्हसी धोक्यात आणू देणार नाही, जितेंद्र आव्हाड आक्रमक

 What’sapp वर तुम्ही काय करत आहात हे आता सरकार बघू शकणार आहे. एवढे दिवस ही फक्त चर्चा होती. पण आज What’sapp या कंपनीने दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली असून, WhatsApp वापरणा-यांची Privacy आम्ही धोक्यात आणू शकत नाही आणि सरकारच्या या अटी आम्हाला मान्य नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी अधोरेखित केलंय.

    नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यात बदल करत व्हॉट्सअॅपकडे (WhatsApp) मेसेजच्या उगमस्थानाची असलेली माहिती देणं बंधनकारक असेल, असं म्हटलं. त्यानंतर व्हॉट्सअॅप याविरोधात थेट दिल्ली उच्च न्यायालयात गेलंय. त्या प्रकरणात आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उडी घेतलीय.

    What’sapp वर तुम्ही काय करत आहात हे आता सरकार बघू शकणार आहे. एवढे दिवस ही फक्त चर्चा होती. पण आज What’sapp या कंपनीने दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली असून, WhatsApp वापरणा-यांची Privacy आम्ही धोक्यात आणू शकत नाही आणि सरकारच्या या अटी आम्हाला मान्य नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी अधोरेखित केलंय.

    नेमकं काय आहे प्रकरण?

    व्हॉट्सअॅपने आपल्या याचिकेत म्हटलं, “व्हॉट्सअॅपच्या कोणत्याही चॅटचा माग काढायला सांगणं म्हणजे प्रत्येक मेसेजवर पाळत ठेवण्यासारखं आहे. यामुळे अँड टू अँड एन्क्रिप्टेडचं उल्लंघन होईल. तसेच नागरिकांच्या राईट टू प्रायव्हसी अधिकाराची गळचेपी होईल.