smriti irani

स्मृती इराणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बांगड्या भेट म्हणून कधी पाठवणार, असा सवाल काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras Gang Rape) घडलेल्या ह्रदयद्रावक घटनेनंतर शनिवारी राहुल गांधी बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास गेले होते. यावर भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी टीका केली होती. यावरुनच कॉंग्रेसने त्यांच्यावर पलटवार केला आहे. . ‘जनतेला हे समजतंय की राहुल गांधींचा हाथरस दौरा हा केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे, न्यायासाठी नाही’ असं म्हणत त्यांनी काँग्रेसच्या हेतूवर शंका उपस्थित केली होती.

स्मृती इराणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बांगड्या भेट म्हणून कधी पाठवणार, असा सवाल काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. रणदीप सुरजेवालांनी ट्विट करत म्हटले आहे की, स्मृती इराणीजी, तुम्ही केवळ इतकंच सांगा की, आदित्यनाथ (Adityanath Yogi) यांना बांगड्या भेट करण्यासाठी कधी जात आहात? अस ट्विट करुन भाजपवर निशाणा साधला आहे.