पुन्हा वादाच्या भोवऱ्या; सेंट्रल व्हिस्टासाठी दिल्लीची शान असलेल्या ऐतिहासिक वास्तूंवर फिरवणार बुलडोझर

प्रकल्पाची सुरुवात झाल्यापासूनच दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. आता तर, या प्रकल्पाबाबतची एक धक्कादायक बाब समोर येत आहे. या प्रकल्पासाठी दिल्लीच्या डझनभर इमारती जमीनदोस्त होणार आहेत. त्यात शतकभरापासून दिल्लीची शान असलेल्या तीन ऐतिहासिक वास्तूंचाही समावेश आहे. राजधानी दिल्ली त इंडिया गेट परिसरात उभ्या असलेल्या तीन ऐतिहासिक बिल्डिंग सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी जमीनदोस्त होणार आहेत. यामध्ये नॅशनल म्युझियम, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस आणि नॅशनल अर्काईव्हची अनेक्स बिल्डिंग यांचा समावेश आहे. इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा मिलाप असलेल्या या प्रत्येक इमारतीचे एक वैशिष्ट्य आहे. राजधानीची शान असलेल्या इमारतींवर मोदींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे बुलडोजर चालणार आहे.

    दिल्ली : प्रकल्पाची सुरुवात झाल्यापासूनच दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. आता तर, या प्रकल्पाबाबतची एक धक्कादायक बाब समोर येत आहे. या प्रकल्पासाठी दिल्लीच्या डझनभर इमारती जमीनदोस्त होणार आहेत. त्यात शतकभरापासून दिल्लीची शान असलेल्या तीन ऐतिहासिक वास्तूंचाही समावेश आहे. राजधानी दिल्ली त इंडिया गेट परिसरात उभ्या असलेल्या तीन ऐतिहासिक बिल्डिंग सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी जमीनदोस्त होणार आहेत. यामध्ये नॅशनल म्युझियम, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस आणि नॅशनल अर्काईव्हची अनेक्स बिल्डिंग यांचा समावेश आहे. इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा मिलाप असलेल्या या प्रत्येक इमारतीचे एक वैशिष्ट्य आहे. राजधानीची शान असलेल्या इमारतींवर मोदींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे बुलडोजर चालणार आहे.

    सरकारची माघार नाहीच

    कोरोनाच्या काळात 20 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम धडाक्यात सुरू आहे. यासाठी इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवनासमोरच्या राजपथावर सगळीकडे खड्डे खणले गेले आहेत. हिरवळीने नटलेल्या या परिसराचे संपूर्ण चित्रच पालटले आहे. मागच्या आठवड्यातच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 70 मान्यवरांनी एकत्र येत या प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याची मागणी सरकारला केली होती. राजधानी दिल्लीची सांस्कृतिक ठेवण बिघडवू नका, अशी विनंती केली. पण, सरकार कुठल्याही पद्धतीने मागे हटण्याच्या विचारात दिसत नाही आहे.

    या इमारतींवर हातोडा

    पंतप्रधान निवासस्थान, सर्व केंद्रीय मंत्रालये, उपराष्ट्रपती निवास एकत्रित, एकाच जागी उभा करणारा हा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी इंडिया गेट परिसरातल्या अनेक ऐतिहासिक इमारती त्यासाठी जमीनदोस्त होणार आहेत. नॅशनल म्युझियम, नॅशनल अर्काइव्ह अनेक बिल्डिंग सोबत शास्त्री भवन, कृषी भवन, विज्ञान भवन, जवाहर भवन, निर्माण भवन, उद्योग भवन, रक्षा भवन या इमारतींवरही हातोडा चालणार आहे. एकूण 4 लाख 58 हजार 820 चौरस मीटरचा परिसर जमीनदोस्त केला जाणार आहे.