श्री राम जन्मभूमी मंदिर कन्स्ट्रक्शन ट्रस्टवरील चंपत राय कोण आहेत? पंतप्रधानांनी त्यांची तातडीने हकालपट्टी करावी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती भडकले

मोदी सरकारने ट्रस्टची निर्मिती केली अन त्यात या भ्रष्टाचाऱ्यांचा सहभागी करून घेतले. चंपत राय कोण होते? हे कोणालाही पूर्वी माहित नव्हते, परंतु त्यांना राम मंदिर ट्रस्टमध्ये सर्वेसर्वा करण्यात आल्याची टीकाही शंकराचार्य यांनी केली आहे.

    नवी दिल्ली: श्री राम जन्मभूमी मंदिर कन्स्ट्रक्शन ट्रस्टवर जमीन घोटाळ्याच्या आरोपा नंतर आता शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी आपले मौन सोडलेले आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हे बेजबाबदार असून त्यांना काढून टाकण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

    नरसिंहपूर जिल्ह्यातील झोटेश्वर येथील परमहंशी गंगा आश्रम येथे द्विपेठाधीश्वर जगतगुरू यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. याचबरोबर अयोध्येत मंदिर बांधण्यात गुंतलेल्या ट्रस्टच्या बहाण्याने त्यांनी आरएसएस आणि भाजपवरही जोरदार निशाणा साधला. यापूर्वी राम जन्मभूमी मंदिर बांधकाम ट्रस्टवर अलीकडे समाजवादी पक्षाचेमाजी मंत्री व आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी जमीन खरेदीच्या नावाखाली घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

    मोदी सरकारने ट्रस्टची निर्मिती केली अन त्यात या भ्रष्टाचाऱ्यांचा सहभागी करून घेतले. चंपत राय कोण होते? हे कोणालाही पूर्वी माहित नव्हते, परंतु त्यांना राम मंदिर ट्रस्टमध्ये सर्वेसर्वा करण्यात आल्याची टीकाही शंकराचार्य यांनी केली आहे.

    इतकेच नव्हे तर केंद्रात बसलेल्या मोदी सरकारवरही त्यांनी नाव न घेता निशाणा साधला . जेव्हा गोहत्या बंदीसाठी संसदेमध्ये त्यांची संख्या २ होती तेव्हा बराच संघर्ष सुरू होता, मात्र आज संसदेत त्यांची संख्या २०० पेक्षा जास्त असताना ते गोहत्याबंदीचा नारा विसरले आहेत, असेही ते म्हणाले.

    श्री राम मंदिराच्या पायाभरणीमध्ये शुभ मुहूर्तकडे लक्ष दिले गेले नाही, मंदिराचा पाया अत्यंत अशुभ मुहूर्तावर भरला गेला आहे. ज्याचा आम्ही निषेधही केला पण कोणीही लक्ष दिले नाही. मंदिराच्या बांधकामासाठी येणारी रक्कम महागड्या किंमतीत जमीन खरेदी करण्यासाठी वापरली जात आहे. इतके बेजबाबदार लोक ट्रस्टवर कसे बसले आहेत. पंतप्रधानांना विश्वस्त पदावरून त्यांना तातडीने काढून टाकले पाहिजे.