नवे सरन्यायाधीश कोण? कायदा मंत्र्यांचे सरन्यायाधीश शरद बोबडेंना पत्र

बोबडे यांनी १८ नोव्हेंबर २०१९ ला सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली होती. ते भारताचे ४७ वे सरन्यायाधीश ठरले होते. न्या. बी. पी. गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील या सर्वोच्च पदाचा मान महाराष्ट्राला तिसऱ्यांदा मिळाला होता. सध्या न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत.

    दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे येत्या 23 एप्रिलला निवृत्त होत आहेत. बोबडेंनंतर आता देशाचे सरन्यायाधीश कोण होणार?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अशातच, केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरन्यायाधीश बोबडे यांनाच पत्र लिहून याबाबत विचारणा केली आहे. पु

    ढील सरन्यायाधीश कोण? असा प्रश्न रविशंकर प्रसाद यांना बोबडेंना विचारला आहे. 48 वे सरन्यायाधीश म्हणून शरद बोबडे कोणाची नियुक्ती करणार आहेत, अशी विचारणा त्यांनी केली आहे.

    बोबडे यांनी १८ नोव्हेंबर २०१९ ला सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली होती. ते भारताचे ४७ वे सरन्यायाधीश ठरले होते. न्या. बी. पी. गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील या सर्वोच्च पदाचा मान महाराष्ट्राला तिसऱ्यांदा मिळाला होता. सध्या न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत.

    आतापर्यंतच्या परंपरेनुसार रमणा देशाचे पुढील सीजेआय म्हणजेच न्यायमूर्ती शरद बोबडे यांचे उत्तराधिकारी असतील. परंपरेनुसार निवृत्त होणारे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील नव्या सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस एक महिन्यापूर्वी राष्ट्रपतींना पत्र पाठवून करतात. सीजेआयकडून हे गोपनिय पत्र राष्ट्रपतींना मिळताच सरकार सर्व औपचारिकता पूर्ण करून ज्येष्ठ असलेल्या जजना मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करते.

    राष्ट्रपती यानंतर त्यांना शपथ देतात. इतिहासात एक-दोन वेळाच असे घडले की, सरकारने ज्येष्ठता क्रमाचे उल्लंघन करत कनिष्ठ जजना सर न्यायाधीश बनविले आहे. यावेळी खूप वादंगही झाले होते. राष्ट्रपतींना पत्र लिहून उत्तराधिकारी निवडण्याची परंपरा अनेक दशकांपासून सुरु आहे.