WHO डेल्टा प्रकाराबद्दल द‍िली चेतावणी; आशिया खंडात तिसऱ्या लाटेचा धोका

आरोग्य संघटनेने नुकतेच कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या प्रकाराबद्दल चेतावणी द‍िली आहे. हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा जास्तच धोकादायक आण‍ि संसर्गजन्य असल्याचे सांग‍ितले आहे. त्यामुळे सगळ्याच देशांनी याला रोखण्यासाठी तयारी करण्यास सांग‍ितले होते

    नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या त‍िसर्‍या लाटेचा धोका न‍िर्माण होत आहे. यामुळे देशातील वातावरण चिंताजनक बनत चाललं आहे. केंद्र सरकारने संबंधित राज्यांना कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कडक पाऊले उचलण्यास सांग‍ितले आहे. भारतात कोरोना महामारीची दुसरी लाट कमी होत, असली तरी आशिया खंडातील कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण भारतात आहे. त्यासोबतच संपूर्ण आशियात लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे. त्यामुळे एकीकडे डेल्टा प्लस व्हेरिएंटची चिंता आण‍ि दुसरीकडे लसीकरणाची कमतरता यामुळे आशियातील काही देशात धोक्याची घंटा वाजत आहे.

    डब्ल्यूएचओने डेल्टा प्रकाराबद्दल द‍िली चेतावणी जागत‍िक आरोग्य संघटनेने नुकतेच कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या प्रकाराबद्दल चेतावणी द‍िली आहे. हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा जास्तच धोकादायक आण‍ि संसर्गजन्य असल्याचे सांग‍ितले आहे. त्यामुळे सगळ्याच देशांनी याला रोखण्यासाठी तयारी करण्यास सांग‍ितले होते. कारण आधीच कोरोनाच्या पह‍िल्या आण‍ि दुसर्‍या लाटेमुळे अनेक देशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

    जगात दुसर्‍या क्रमांकावर भारत

    देशात आतापर्यंत कोरोनाचे ३.०५ कोटी रुग्ण आढळले असून यात ४ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ४ लाख ८० हजार लोकांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, र‍िकव्हरी रेट९६. ९७टक्के असून आतापर्यंत २.९६ कोटी उपचार घेत बरे झाले आहे.