Why do you interfere in Priyanka's faith? There is no objection to becoming a Christian

दिल्ली : अंतर्गत मतभेदांचा सामना करीत असलेला काँग्रेस पक्ष अध्यक्षपदासाठी आता एप्रिल महिन्यात निवडणूक घेण्यावर विचार करीत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारूण पराभवापाठोपाठ अनेक राज्यातील स्थानिक व राज्य निवडणुकीतही पराभवाची नामुष्की ओढवल्यामुळे पक्षांतर्गत असंतोष वाढला होता. हा असंतोष शमविण्यासाठी काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. तसे पाहता, राहुल गांधी यांनी जर अध्यक्षपदाची निवडणूक लडविण्यास नकार दिला तर प्रियाका गांधी रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

यासोबत पक्षनेतृत्व संघटनात्मक निवडणुकांच्या पर्यायावरही विचार करीत आहे. राहुल गांधी यांनी अद्यापही पक्षनेत्यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार की नाही याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष बनवले होते. काँग्रेसच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी राहुल गांधी इच्छुक नसतील तर त्यांची बहिण प्रियांका गांधी वढेरा या अध्यक्षपादासाठी संभाव्य उमेदवार असू शकतात. तसे झाल्यास अध्यक्षपदाची निवडणूक रंजक होण्याची शक्यता आहे.

प्रियांका गांधी यांनी जर अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास गांधी कुटुंबाशी जवळीक असणारे अनेक वरिष्ठ नेतेही रिंगणात उतरू शकतात अशी चर्चा आहे. तसे झाल्यास काँग्रेस अध्यपदाची निवडणूक रंजक होण्याची शक्यता आहे. तथापि यामुळे पक्षावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कार्यसमितीचे एक पदाधिकारी आणि राहुल गांधींच्या नीकटवर्तीयाने काँग्रेससमोर एकमेव पर्याय आहे तो म्हणजे सर्वप्रथम पक्ष स्थिर करणे आणि नंतर कोणत्याही प्रकारच्या पुनर्बांधणीसाठी तत्पर राहणे, जेणेकरून गांधी कुटुंबातील एखादा सदस्य पदभार स्वीकारण्यास तयार होऊ शकेल.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसामसारख्या प्रमुख राज्यांच्या आगामी निवडणुकांनंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. आसाममध्ये सत्ताधारी भाजपाला आव्हान देणारा काँग्रेस हा मुख्य प्रतिस्पर्धी आहे तर तामिळनाडूमध्ये द्रमुकबरोबर विरोधी पक्षात आहे. तसे पाहता, बंगालमध्ये होत असलेली निवडणूक पक्षसाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपाने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळेच काँग्रेससमोरील आव्हानही वाढले आहे.