narendra modi in atal tunnel

बोगद्यामध्ये कोणीच नव्हते तर मोदी नक्की कोणाला हात करत होते असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. हा प्रश्न उपस्थित करणारे अनेक ट्विट फोटो आणि व्हिडिओंसहीत पोस्ट करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींबरोबरच या सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा उपस्थित होते. मात्र या सोहळ्यासाठी उपस्थित राहलेल्या पंतप्रधान मोदींच्या एका कृतीवरुन सध्या सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे.

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) शनिवारी हिमाचलमधील अटल बोगद्याचे (Atal Tunnel) उद्घाटन केलं. मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडणाऱ्या या ९.०२ कि.मी. लांबीच्या बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी आलेले मोदी हे रिकाम्या बोगद्यामध्ये कोणीही नसताना कोणाला हात उंचावून दाखवत होते असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

बोगद्यामध्ये कोणीच नव्हते तर मोदी नक्की कोणाला हात करत होते असा प्रश्न (Whom did Modi show his hand ) नेटकऱ्यांनी विचारला आहे. हा प्रश्न उपस्थित करणारे अनेक ट्विट फोटो आणि व्हिडिओंसहीत पोस्ट करण्यात आले (Netizens Trolled Modi) आहेत. पंतप्रधान मोदींबरोबरच या सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा उपस्थित होते. मात्र या सोहळ्यासाठी उपस्थित राहलेल्या पंतप्रधान मोदींच्या एका कृतीवरुन सध्या सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्षांनीही विचारला होता प्रश्न

पंतप्रधान मोदी रिकाम्या बोगद्यात कोणाला हात उंचावून दाखवत होते त्यांची तब्येत तर ठीक आहे ना? त्यांच्या तब्येती विषयी जनतेला कळायला हवे. असा टोलाही त्यांनी लगावला होता. निर्मनुष्य असलेल्या बोगद्यात कोणाकडे पाहून नरेंद्र मोदी हात उंचावत होते. तेथे तर जनता उपस्थित नव्हती?. देशाला अनर्थतेच्या खाईत घेऊन जाणाऱ्या पंतप्रधानांच्या आरोग्यावर परिणाम तर झाला नाही ना?, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केलीये. जनतेला पीएम मोदींच्या प्रकृतीची माहिती मिळायलाच हवी, विशेष म्हणजे यापूर्वीही आदरणीय महोदयांनी अनेकदा असं केलं आहे. असे ट्विट करत प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.