मोदी आणि ठाकरेंनी लस का टोचून घेतली नाही?

दिल्ली (Delhi).  कोरोना प्रतिबंध लसीकरणाला देशात शनिवारपासून सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे; मात्र राजकीय नेत्यांमध्ये या लसीसंदर्भात प्रचंड रस्सीखेच चालू आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः लस का टोचून घेत नाहीत, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

पत्रकारांशी बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले,’मोदी आणि ठाकरेंनी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेतली नाही? पंतप्रधानांनी आणि ठाकरेंनी लसीकरणाचा गाजा वाजा न करता कोविड लस स्वतः सिरींज भरून जनतेसमोर त्यामधील औषध टोचून घ्यावे. तेव्हाच जनतेला कोविड लसीबद्दल विश्वास निर्माण होईल. असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.