तुम्हाला दहा लाखांचा दंड का ठोठावू नये ? सुप्रीम कोर्ट याचिकाकर्त्यावर संतापले

देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असून कोरोनामुळे होणारे मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या उच्चांक गाठत आहे. देशातील विविध उच्च न्यायालयांसह सर्वोच्च न्यायालयात कोरोनाशी संबंधित विषयांवर याचिका दाखल करण्यात आल्या असून शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले आहे. तुम्हाला दहा लाखांचा दंड का ठोठावू नये, अशी विचारणाही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

    दिल्ली : देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असून कोरोनामुळे होणारे मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या उच्चांक गाठत आहे. देशातील विविध उच्च न्यायालयांसह सर्वोच्च न्यायालयात कोरोनाशी संबंधित विषयांवर याचिका दाखल करण्यात आल्या असून शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले आहे. तुम्हाला दहा लाखांचा दंड का ठोठावू नये, अशी विचारणाही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

    अनेकविध मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, एका याचिकेच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी याचिकाकर्त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी डॉक्टरांना सल्ला देता, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने यावेळी केली.

    कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या प्रार्श्वभूमीवर कोरोनाच्या औषधांसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. कोरोना चाचणी आणि उपचारांची पद्धत सुचवणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. तुम्ही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहात आणि डॉक्टरांना कोणत्या औषधांचा वापर करावा याबाबत सल्ला देता? असा प्रश्न न्यायालयाने विचारला.

    तसेच १० लाखांचा दंड ठोठावू, अशी सक्त ताकीद दिली. यावर, मी बेरोजगार असून, माझ्याकडे केवल एक हजार रुपये आहेत, असे याचिकाकर्त्याने सांगितले. ठीक आहे, तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात येतो, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.