India Flag Animation (Close-up)
India Flag Animation (Close-up)

धर्मावरील हल्ल्यांचा स्विकार करण्यास संयुक्त राष्ट्र तयार नाही.

 

नवी दिल्ली: हिंदु, शीख आणि बौद्ध धर्माविरूद्धचा ‘वाढता तिरस्कार’ स्विकारण्यास अयशस्वी ठरल्याबद्दल भारताने यु.एन. ची निंदा केली आहे .  हिंदू(Hindu), बौद्ध( Budha) आणि शीख धर्माविरूद्ध वाढता द्वेष आणि हिंसाचाराच्या घटनांचा संयुक्त राष्ट्र संघटना केवळ निषेध करते. त्या पलिकडे या धर्मावरील हल्ल्यांचा स्विकार करण्यास संयुक्त राष्ट्र तयार नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या ‘निवडकतेवर’ भारताने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र धर्मविरोधी, इस्लामोफोबिया आणि ख्रिश्चनविरोधी कृत्ये याचा त्यांनी ठाम निषेध केल्याचे भारताने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रचे ठराव केवळ या तीन अब्राहम धर्म (यहूदी धर्म, इस्लाम आणि ख्रिश्चन) यांच्यावर होणाऱ्या द्वेष आणि हल्ल्यांबाबत एकत्रित बोलतात. मात्र हिंदू, शिख आणि बौध्द धर्मावर होणारे हल्ल्यांवर संयुक्त राष्ट्र(UN) बोलत नाहीत , असा आक्षेप भारताने घेतला आहे. संयुक्त राष्ट्राची सर्वसाधारण सभा बौद्ध, हिंदू आणि शीख धर्माविरूद्धच्या द्वेष आणि हिंसाचाराच्या वाढीची कबुली देण्यास अपयशी ठरली आहे, असे न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र संघात स्थायी मिशनचे भारताचे सचिव आशिष शर्मा यांनी सांगितले.

शर्मा भारतीय परराष्ट्र सेवेतील 2009 च्या बॅचचे अधिकारी असून बुधवारी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारन सभेत कल्चर ऑफ पीस “शांतीची संस्कृती” या विषयावर झालेल्या अधिवेशनात भारत सरकारच्या वतीने निवेदन दिले होते. संयुक्त राष्ट्राची हीच ‘निवडकता’ का ? असा देखील प्रश्न शर्मा यांनी उपस्थित केला आहे. ठराव संमत झाल्यावर वरील धर्मांवरील हल्ल्यांना ख्रिश्चन, यहुदी आणि इस्लाम या तीन अब्राहमिक धर्मांच्या यादीत समाविष्ट केले जावे, अशी मागणी भारताने केली .