100 कोटी वसुलीप्रकरणी उद्धव ठाकरे, शरद पवार गप्प का?; केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

सचिन वाझे निलंबीत असताना त्याला कोणाच्या दबावातून पुन्हा पोलीस दलात घेतले. उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे पूत्र आहात. राज्यात तुम्ही बेईमानीचे सरकार स्थापन केले आहे.या प्रकरणाची गंभीर चौकशी करणे गरजेचे आहे. यासाठी भाजपा महाराष्ट्रात विविध भागात आंदोलन करणार असल्याचं रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं.

  • ravishankar prasad, sharad pawar, udhav thakre

दिल्ली : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. याचं पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

म्हणाले की, सचिन वाझे निलंबीत असताना त्याला कोणाच्या दबावातून पुन्हा पोलीस दलात घेतले. उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे पूत्र आहात. राज्यात तुम्ही बेईमानीचे सरकार स्थापन केले आहे.या प्रकरणाची गंभीर चौकशी करणे गरजेचे आहे. यासाठी भाजपा महाराष्ट्रात विविध भागात आंदोलन करणार असल्याचं रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं.

शरद पवारांनी आपल्या स्तरावर काय कारवाई केली आहे, त्यांनी गुन्हा रोखण्यासाठी काय चौकशी केली आहे. असा सवाल प्रसाद यांनी उपस्थित केला. हे फक्त भ्रष्टाचाराचे प्रकरण नाही. हे ऑपरेशन लुटालूट आहे. हा वसुलीचा गुन्हा असून या प्रकरणात शरद पवारांना सत्तेचा हिस्सा नसताना माहिती पुरविली जात आहे. मग ते जर सत्तेचा भाग नाहीत तर त्यांना कोणत्या आधारे माहिती पुरविली जात आहे. असं रवीशंकर प्रसादांनी म्हटलं आहे.