Wife joins army; A unique tribute to the martyred husband

मेजर धोंडियाल आणि नितीका यांच्या लग्नाला अवघा 10 महिन्यांचा काळ उलटला होता आणि एप्रिल 2019मध्ये दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. आपल्या पतीला शूर सैनिक म्हणत नितीका कौल म्हणाल्या की, पतीची ही आहुती अनेक लोकांना सैन्यात सामील होण्यासाठी प्रेरणा देईल, याचा मला विश्वास आहे. मेजर विभूती शंकर धौंडियाल यांचे पार्थिव आपल्या गावी पोहोचले तेव्हा पत्नी नितीका यांना त्यांच्याबद्दल अभिमान वाटला. मेजर धौंडियाल यांच्या मृतदेहाजवळ उभे राहून नितीका यांनी आपल्या पतीला सलाम केला.

    दिल्ली : नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. जम्मू-काश्मीरच्या पुलवामात पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना असलेल्या जैश ए मोहम्मदच्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची पत्नी नितीका कौल या भारतीय लष्करात सामील झाल्या आहेत. सैन्यात भरती झाल्यानंतर त्या आता ‘लेफ्टनंट नितीका धौंडियाल’ बनल्या आहे. नितीका यांनी शनिवारी भारतीय लष्कराचा गणवेश परिधान करून हुतात्मा मेजर विभूती शंकर यांना श्रद्धांजली वाहिली.

    दहशतवाद्यांचा बिमोड करणार

    मेजर विभूती फेब्रुवारी 2019 मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले होते. 18 फेब्रुवारी 2019 रोजी, जम्मू-काश्मिरच्या पुलवामा येथे मेजर धौंडियाल यांना वीरगती प्राप्त झाली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 40 सैनिक शहीद झाले होते. या हल्ल्यानंतरच सैन्याने पुलवामाच्या पिंगलान गावात दहशतवाद्यांना संपवण्यासाठी मोहीम राबवली होती. पिंगलानमध्ये झालेल्या या चकमकीत 40 सैनिक ठार झाले. या हुतात्म्यांमध्ये प्रमुख रँक अधिकारी विभूती धौंडियाल यांचादेखील समावेश होता.

    त्यांच्या हौतात्म्याने अनेकांना प्रेरणा

    मेजर धोंडियाल आणि नितीका यांच्या लग्नाला अवघा 10 महिन्यांचा काळ उलटला होता आणि एप्रिल 2019मध्ये दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. आपल्या पतीला शूर सैनिक म्हणत नितीका कौल म्हणाल्या की, पतीची ही आहुती अनेक लोकांना सैन्यात सामील होण्यासाठी प्रेरणा देईल, याचा मला विश्वास आहे. मेजर विभूती शंकर धौंडियाल यांचे पार्थिव आपल्या गावी पोहोचले तेव्हा पत्नी नितीका यांना त्यांच्याबद्दल अभिमान वाटला. मेजर धौंडियाल यांच्या मृतदेहाजवळ उभे राहून नितीका यांनी आपल्या पतीला सलाम केला. नितीका म्हणाल्या, ‘तू माझ्यापेक्षा आपल्या देशावर अधिक प्रेम करतोस आणि मला त्याचा अभिमान आहे. 30 वर्षीय नितीकांनी गेल्या वर्षी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) परीक्षा दिली होती, त्यानंतर त्या सैन्यात दाखल झाल्या. आता त्या देखील आपल्या पतीप्रमाणेच सैन्याच्या अधिकाऱ्यांचा गणवेश परिधान करून शत्रूविरूद्ध लढायला सज्ज झाल्या आहेत.