ब्लॅक फंगसवर आठवडाभरात औषध आणणार; रामदेव बाबांचा दावा

ॲलोपॅथी आणि डॉक्टरांसंदर्भात केलेल्या विधानावरून वाद सुरू असतानाच योगगुरु रामदेव यांनी देशात वेगाने पसरलेल्या ब्लॅक फंगसवर चिंता व्यक्त केली आहे. यासोबतच या आजारावरील औषध एक आठवड्यात आणणार असल्याचे तसेच याची किंमत ॲलोपॅथी औषधांच्या तुलनेत कमी असेल असाही दावा केला. ॲलोपॅथिक औषधांच्या किमतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना 2 रुपयांचे औषध दोन हजार रुपयात विकले जाते असा आरोपही त्यांनी केला.

    दिल्ली : ॲलोपॅथी आणि डॉक्टरांसंदर्भात केलेल्या विधानावरून वाद सुरू असतानाच योगगुरु रामदेव यांनी देशात वेगाने पसरलेल्या ब्लॅक फंगसवर चिंता व्यक्त केली आहे. यासोबतच या आजारावरील औषध एक आठवड्यात आणणार असल्याचे तसेच याची किंमत ॲलोपॅथी औषधांच्या तुलनेत कमी असेल असाही दावा केला. ॲलोपॅथिक औषधांच्या किमतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना 2 रुपयांचे औषध दोन हजार रुपयात विकले जाते असा आरोपही त्यांनी केला.

    आयुर्वेद आणि योग यामुळे अनेकांचा गंभीर आजारातून जीव वाचविला आहे, हे कोणीच नाकारू शकणार नाही. जे लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तेच आमच्यावर जळतात. एक गरीब घरचा मुलगा जो धोती घालतो, तो मोठमोठ्या कंपन्यांची दुकाने तर बंद करणार नाही ना, अशी भीती त्यांना वाटते असेही बाबा रामदेव म्हणाले.

    दरम्यान, आयएमए ॲलोपॅथीचे कंत्राटदर नाही तर एनजीओ असल्याची टीकाही त्यांनी केली. ते इंग्रजांच्या काळापासूनच स्थापन झाले असल्याने त्यांच्याबाबत गंभीरतेने विचार करण्याची आवश्यकता नाही, अशी टीप्पणीही रामदेव यांनी केली. ॲलोपॅथीचे निर्माता महर्षी सुश्रूत होते हे विसरून चालणार नाही, आठवणही त्यांनी करून दिली.

    ॲलोपॅथीच्या चांगल्या डॉक्टरांचा सन्मान करतो असे सांगत आयुर्वेदचा अपमान का केला जात आहे असा सवालही रामदेव यांनी केला. परंतु गुगलवर सर्च केले असता आयुर्वेदला ‘स्टुपिड सायन्स’ सांगितले जाते, अशी टीका त्यांनी केली.