जूनमध्ये 9 ते 10 कोटी कोव्हिशिल्ड डोस देणार; सीरमचा अमित शहांना शब्द

सीरम जूनमध्ये 9 ते 10 कोटी लसी पुरविणार आहे. अधिकृत सुत्रांनी याची माहिती दिली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना सीरमने पत्र लिहिले होते. यामध्ये कोरोना महामारीच्या संकटात आमचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. सीरमचे सरकारी आणि नियामक बाबींचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी हे पत्र लिहिले आहे. 

    जूनमध्ये एकटी सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute ) 9 ते 10 कोटी कोव्हिशिल्डचे डोस देणार असल्याने लसीकरण मोहिमेला (Corona Vaccination Drive) मोठा दिलासा मिळण्याबरोबरच वेगही मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशात सध्या दोन कंपन्यांच्या लस उपलब्ध आहेत. रशियाची तिसरी लस स्पुतनिक व्ही ही देखील या आठवड्यापासून मिळण्यास सुरुवात होणार आहे.

    केंद्राने सारा साठा बुक केल्याने आणि राज्यांवर 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाची जबाबदारी टाकल्याने कंपन्यांनीदेखील हात वर केले होते. यामुळे राज्यांना या वयोगटासाठी लस मिळालेली नाहीय. जी मिळाली ती देखील तुटपुंजी होती. यामुळे केंद्र आणि राज्यांमध्ये वाद झाले होते. तसेच सीरमच्या एका उच्च पदस्थानेदेखील मोदी सरकारच्या या धोरणावर प्रश्न उपस्थित केले होते.