‘या’ कंपनीत ‘वर्क फ्रॉम होम’ ची सुविधा सप्टेंबर २०२१ पर्यंत

कोरोनाच्या संक्रमणाचा चढउतारही अद्याप सुरूच आहे. याची खबरदारी घेत गुगलने सप्टेंबर २०२१ पर्यंत कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा कालावधी वाढवला आहे.

कोरोनाच्या संसर्गाचा फटका जगातील अनेक कंपन्याना बसला आहे. अद्यापही कोरोनाचे संकट टळलेले नसल्यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ (work from home)करायला लावले आहे. भारतात कोरोनामुळे लॉकडाऊन संपला असलातरी रेल्वेसह अनेक सेवा पूर्व दांवर आलेल्या नाहीत. अश्यातच कोरोनाच्या संक्रमणाचा चढउतारही अद्याप सुरूच आहे. याची खबरदारी घेत गुगलने सप्टेंबर २०२१ पर्यंत कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा कालावधी वाढवला आहे.

यामुळे गुगलचे जवळपास २,००,००० कर्मचारी आता सप्टेंबर २०२१ पर्यंत आपल्या घरून काम करू शकणार आहेत. यानंतर ऑफिस उघडल्यानंतर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ तीन दिवस कार्यालयात यावे लागणार आहे. बाकीची तीन दिवस पुन्हा वर्क फ्रॉमची सुविधा देण्यात आली आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला आहे. त्यात म्हटले आहे की, कंपनी फुल हायब्रिड वर्क फोर्स मॉडलचा अवलंब करीत आहे. यासाठी प्रयोग केले जात आहे. कारण, प्रोडक्टिविटीवरून कोणतीही समस्या उद्धवू नये. गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना २०२१ च्या दुसऱ्या सहामाही मध्ये करोना लस सुद्धा देणार आहे.