‘World Happiness Report 2021’ - Citizens of Pakistan, Bangladesh, Nepal, Sri Lanka are happier; This country is in the top position. Where did this country lose the happiness of Indians?

संयुक्त राष्ट्र संघाने (युएन) ‘वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2021’ नुकताच जाहीर केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अहवालात पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेतील नागरिक भारतीयांपेक्षा जास्त सुखी आणि आनंदी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे पाहता, भारतीयांना आनंद हरवला तरी कुठे?, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

  दिल्ली : कोरोना प्रादुर्भावामुळे जगातील सर्वच देश मेटाकुटीस आले आहे. गेल्या वर्षभरापासून जगभरातील श्रीमंत असो किंवा गरीब, विकसित असो किंवा विकसनशील, अशा सर्वच देशातील नागरिकांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. कोरोनाने जगभरातील नागरिकांच्या आनंदावर विरजण आणले आहे. मात्र, असे असतानाही फिनलँड सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात सुखी देश ठरला आहे.

  संयुक्त राष्ट्र संघाने (युएन) ‘वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2021’ नुकताच जाहीर केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अहवालात पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेतील नागरिक भारतीयांपेक्षा जास्त सुखी आणि आनंदी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे पाहता, भारतीयांना आनंद हरवला तरी कुठे?, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

  युएनच्या अहवालात १३९ वा क्रमांक

  यंदा कोरोनाची साथ असूनही सलग चौथ्या वर्षी फिनलँड हा जगातील सर्वात सुखी देश ठरला आहे. लोकांचा संपादन करण्यात फिनलँडला पुन्हा एकदा यश प्राप्त झाले आहे. कोरोना संकटादरम्यान नागरिकांचे जीवनमान रुळावर आणण्यासाठी देशाने मोठी मदत केली आहे. संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या या यादीत १४९ देशांचा समावेश करण्यात आला आहे.

  विशेष म्हणजे आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांपेक्षाही खाली आहे. १४९ देशांच्या यादीत भारत १३९ क्रमांकावर आहे. ही यादी जाहीर करताना देशाची जीडीपी, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर पश्न विचारले जाऊन हॅपीनेस स्कोर तयार केला जातो.

  यानुसार पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त आनंदी आहेत. भारताच्या मागे असलेल्या दहा देशांमध्ये बुरुंडी, येमेन, टांझानिया, हैती, मलावी, लेसोथो, बोत्सवाना, रवांडा, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.

  अमेरिका ‘टॉप टेन’मधून बाहेरच

  या यादीत चीन ८४ व्या स्थानी, पाकिस्तान १०५, नेपाळ ८७ व्या स्थानी तर बांगलादेश आणि श्रीलंका अनुक्रमे १०१ आणि १२९ व्या स्थानी आहेत. डेन्मार्क या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर, स्वित्झर्लंड, आईसलँड आणि नेदरलँड या देशांनी अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला आहे. न्यूझीलँडची यावेळी एका स्थानाने घसरण झाली असून तो नवव्या स्थानी आहेत.

  पहिल्या १० देशांमध्ये केवळ न्यूझीलँडला स्थान मिळू शकलेले आहे. जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेला या यादीत पहिल्या दहा देशांमध्ये स्थान मिळालेले नाही. जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये अमेरिकेचा १९ वा क्रमांक आहे. जर्मनीच्या क्रमवारीत यंदा सुधारणा झाली असून तो १७ व्या स्थानावरून १३ व्या स्थानावर आला आहे. फ्रान्स २१ व्या स्थानी, तर ब्रिटन १३ व्या स्थानावरून १७ व्या स्थानी गेला आहे.

  दु:खी देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानी

  आफ्रीकेचे देशे लेसोथो, बोत्सवाना, रवांडा आणि झिम्बाब्वे यादीमध्ये सर्वात खालच्या स्थानी आहेत. अफगाणिस्तान जगातील सर्वात दु:खी देश आहे. महामारीचा परिणाम जाणून घेण्यासाठी मागील वर्षाच्या डेटासोबत तुलना करण्यात आली. यात दिसून आले की, एक तृतीयांश देशांमधील लोकांमध्ये नकारात्मकता वाढीस लागली आहे. तर, २२ देशांमध्ये सकारात्मकता वाढली आहे. दु:खी देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानी आहे. चीन या यादीत ८५ व्या स्थानी आहे. पाकिस्तानचा यादीत १०५ वा नंबर असून नेपाळ ८७ व्या स्थानी आहे. बांगलादेश १०१ व्या स्थानी, तर श्रीलंका १२९ व्या स्थानी आहे.

  जगातील Top 20 देश

  • फिनलँड
  • डेमार्क
  • स्वित्झर्लंड
  • आईसलँड
  • नेदरलँड
  • नॉर्वे
  • स्वीडन
  • लक्झेंबर्ग
  • न्यूझीलंड
  • ऑस्ट्रिया
  • ऑस्ट्रेलिया
  • इस्त्राईल
  • जर्मनी
  • कॅनडा
  • आयर्लंड
  • कोस्टा रिका
  • युनायटेड किंगडम
  • झेक प्रजासत्ताक
  • युनायटेड स्टेट्स
  • बेल्जियम