कोरोनाबाबात संपूर्ण जगाला सतावत असलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडले; जागतिक आरोग्य संघटनेचे आशावादी वक्तव्य

दिल्ली : कोरोने संकट कधी संपणार असा प्रश्न साऱ्या जगावला सतावत आहे. याबाबत  जागतिक आरोग्य संघटनेने एक आशावादी वक्तव्य केले आहे.

करोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी केलं आहे.

जगातील अनेक देशांमध्ये लसींवर काम सुरु आहे. काही ठिकाणी लसी तिसऱ्या टप्प्यातही आहेत. त्यांचे परिणाम पाहता करोना महामारी संपेल असं स्वप्न पाहण्यास हरकत नाही असं मत टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी व्यक्त केलं आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. असं असलं तरीही प्रगत आणि श्रीमंत देशांनी  गरीब आणि मागास देशांना लसीच्या आशेवर ठेवू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

“करोना काळात जगाने माणसाची चांगली रुपं पाहिली आहेत तशीच वाईटही रुपं पाहिली आहेत. मात्र, ही महामारी संपली तरीही गरीबी, भूक आणि असमानता यामध्ये परिवर्तन होऊ शकतं हे विसरुन चालणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.