‘या’ कलाकारांनी भडकवकले शेतकरी आंदोलन ; कंगना पुन्हा बरळली

दलजितने व्हिडीओ शेअरकेल्यानंतर काही वेळातच कंगनाने सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ शेअर केला, असून यात तिने दिलजीत दोसांज आणि प्रियांका चोप्राचं नाव घेत यांनी आंदोलन भडकवल्याचा आरोप कंगनाने केला आहे.

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून दिल्ली हरियाणाच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या बाजूने व विरोधात कलाकारांमध्येही दोन गट पडलेले पाहायला मिळतात. काहीदिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने शेतकरी आंदोलनात बाबात वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिच्या या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार गायक कलाकार दलजितसिंग दोसांज याने घेतला होता.

आज पुन्हा एकदा दलजितसिंगने कंगनाच्या आवाजाची मिमिक्री करणारा व्हिडीओ करत तिची खिल्ली उडवली आहे. तो म्हणाला, की कंगनाला दिवसातून एकदा त्याचं नाव घेतल्याशिवाय जेवण पचत नाही. त्याने स्वत:च्या नावाची तुलना डॉक्टरच्या औषधासोबत केली आहे.

कंगनाने २७ नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावरून शेतकरी आंदोलनात सामिल झालेल्या एका वयोवृद्ध महिलेविरोधात अपमानजनक वक्तव्य केले होते पण नंतर कंगनाने ट्विट डिलीट केले होते. मात्र, जेव्हा दिलजीतने यावरून कंगनावर टीका केली तेव्हापासून दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले आहे. केवळ दिलजीतच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कंगनावर तिच्या भाषेसाठी टीका केली होती.