शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ‘या’ साहित्यिकांनी पुरस्कार केले परत ; मराठी साहित्यिकही आंदोलकांच्या सोबत

शेतकरी आंदोलनास महाराष्ट्रातील साहित्यिकांनी पाठिंबा दर्शविला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या कृषी विषयक कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साहित्यिक  (litterateur) क्षेत्रातील साहित्यिक मंडळीही पुढे सरसावली आहे . आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लेखक डॉ. मोहनजीत चिंतक , डॉ. जसविंदर व पत्रकार स्वराजबीर यांनी आपले ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार परत केले आहेत. यापूर्वी गुरुवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनीही आपला पद्मविभूषण पुरस्कार ( (Award) परत केला आहे. याशिवाय राज्यसभा खासदार सुखदेव सिंह ढींढसा यांनीही पद्मभूषण पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे .

याबरोबरच महाराष्ट्रातीलही ( Maharashtra) ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, रा. रं. बोराडे, तारा भवाळकर, नंदा खरे, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, भास्कर चंदनशिव, रंगनाथ पठारे, चंद्रकांत पाटील, इंद्रजीत भालेराव, प्रफुल्ल शिलेदार, प्रमोद मुनघाटे, उल्का महाजन, सुरेखा दळवी, राजन गवस, आसाराम लोमटे, प्रविण बांदेकर, अतुल देऊळगावकर, नारायण कुळकर्णी कवठेकर, आनंद विंगकर,बालाजी सुतार, अजय कांडर, संदेश भंडारे, संजीव चांदोरकर, अरुणा सबाने, नंदकुमार मोरे, गोविंद काजरेकर, संदीप जगदाळे, प्रसाद कुमठेकर यांचा यात समावेश आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे.

शेतीच्या शोषणव्यवस्थेची मांडणी करणाऱ्या महात्मा जोतीराव फुले यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटलांपर्यंत अनेक धुरीणांनी याच मातीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने लढे दिले. आज दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत ठामपणे राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, असे म्हणत शेतकरी आंदोलनास महाराष्ट्रातील साहित्यिकांनी पाठिंबा दर्शविला आहे.