flying dog

युट्यूबवर (YouTube) वर व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी एका तरुणाने कुत्र्याला त्रास दिल्याचा आरोप केला जात आहे. त्याने त्या कुत्र्याला त्रास दिल्याची(Bad Behaviour with pet dog) तक्रार मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये  करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली: अलिकडे सोशल मीडियाचा वापर करुन (Social Media) झटपट प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकजण याचा सदुपयोग करून चांगला कंटेट प्रेक्षकांना देतात, मात्र काहीजण याचा दुरुपयोग करण्याचा मार्ग निवडतात. दक्षिण दिल्लीतून (South Delhi) देखील असाच एक प्रकार समोर आला आहे.

    युट्यूबवर (YouTube) वर व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी एका तरुणाने कुत्र्याला त्रास दिल्याचा आरोप केला जात आहे. त्याने त्या कुत्र्याला त्रास दिल्याची(Bad Behaviour with pet dog) तक्रार मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये  करण्यात आली आहे. पोलिसांनी या युट्यूबरला अटक केली आहे.

    पीपल्स फॉर ॲनिमल्स सोसायटी या संस्थेच्या गौरव गुप्ता यांनी या विषयीची तक्रार मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. त्यांनी असा आरोप केला होता की, गौरव शर्मा या ३२ वर्षीय तरुणाने एक व्हिडीओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने हेलियमच्या फुग्यांना एका पाळीव कुत्र्याला बांधले होते. फुगे हवेत सोडल्यानंतर कुत्रा देखील हवेत उडू लागला होता आणि त्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला होता अशी तक्रार गुप्ता यांनी केली आहे.

    हा व्हिडीओ २१ मे रोजी शूट करण्यात आला होता. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौरव गुप्ता यांनी पुढाकार घेत तक्रार नोंदवली होती. पी.एस. मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.