क्रिकेटपटू युवराज सिंगचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, पण पुरस्कार परत देण्याबाबत वेगळं मत

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारनं तातडीनं तोडगा काढणं गरजेचं असल्याचं सांगत क्रिकेटपटू युवराज सिंगनं आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचं जाहीर केलंय. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यातील वाद लवकरात लवकर मिटावा, अशी इच्छा त्यानं व्यक्त केलीय.

प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगनं दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केलाय. आपल्या ट्विटर हँडलवरून त्यानं शेतकरी आंदोलनाचं समर्थन करत त्यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याची घोषणा त्यानं केलीय.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारनं तातडीनं तोडगा काढणं गरजेचं असल्याचं सांगत क्रिकेटपटू युवराज सिंगनं आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचं जाहीर केलंय. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यातील वाद लवकरात लवकर मिटावा, अशी इच्छा त्यानं व्यक्त केलीय.

शेतकरी हेच देशाचे अन्नदाते असून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावेत. शांततापूर्ण आणि चर्चेच्या मार्गानंच यावर तोडगा निघू शकतो, असं युवराज सिंगनं ट्विट केलंय.

मात्र युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी केलेल्या विधानाचं त्यानं खंडन केलंय. युवराज सिंग आपले सर्व पुरस्कार केंद्र सरकारला परत करणार असल्याचं विधान योगराज सिंग यांनी केलं होतं. मात्र आपण असं काही करणार नसून आपली विचार करण्याची पद्धत वेगळी असल्याचंही युवराज सिंगनं म्हटलंय.