धुळे

Aryan Khan Case आर्यन खान प्रकरण : सुनील पाटलांचे धुळ्यातील घर ‘लॉक’
धुळ्यात सुनील पाटीलचे येणे-जाणे कमीच होते. केव्हा तरी तो धुळे शहरातच माहेर असलेल्या पत्नीसह मुलगी, आई- वडीलांना भेटण्यासाठी येत होता. त्याच्या वडिलांचे तीन महिन्यांपूर्वीच निधन झाले. ते सरळमार्गी होते. तेली समाजात विवाह जुळवणे व शेतीत त्यांना रस होता. त्यांना मुलगा सुनीलची वर्तणूक पसंत नव्हती. त्यामुळे ते नेहमी मुलास रागवायचे व कष्टाने जीवन जगण्याचा सल्ला देत.