धुळ्यातील मार्केटला भीषण आग ; आगीत ४० दुकाने जळून खाक

धुळे शहरातील पाच कंदील परिसरातील शंकर मार्केटला आज पहाटे भीषण आग लागली.जुनी कापडा बाजारपेठ असल्याने रौद्ररूप धारण केलेल्या या आगीने बघता बघता झपट्याने पसरत गेलेल्या आगीने तासभरात मार्केट मधील जवळपास ४० दुकानांची राखरांगोळी केली आहे

    धुळे  : भल्या लागलेल्या आगीत मार्केट मधील जवळपास ४० दुकाने जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली आहे. तासाभरातच आगीने रौद्ररूप धारण केले. अमळनेर, शिरपूर,धुळे येथील अग्निशमन बंबच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला असून छोट्या छोट्या गलींमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे.

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुळे शहरातील पाच कंदील परिसरातील शंकर मार्केटला आज पहाटे भीषण आग लागली.जुनी कापडा बाजारपेठ असल्याने रौद्ररूप धारण केलेल्या या आगीने बघता बघता झपट्याने पसरत गेलेल्या आगीने तासभरात मार्केट मधील जवळपास ४० दुकानांची राखरांगोळी केली आहे.वर पर्यंत धुराचे लोट बघून नागरिक भयभीत झाले होते.आग विझविण्यासाठी अमळनेर, शिरपूर व धुळे येथील अग्निशमन बंब घटनास्थळी बोलविण्यात आले.4 तासापासून आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते.मात्र या बाजारपेठेत लहान रस्ते असल्याने अग्निशमन बंब पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. यामुळे आग विझविण्यासाठी अडचण निर्माण झाली होती.सुदैवाने यात कुठलीही जिवतहानी झालेली नाही.मात्र भल्या पहाटे झाले आगीच्या घटनेमुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.