कोरोना सदृश्य लक्षणे; भितीने धुळ्यातील शिक्षकाने उचलेले टोकाचे पाऊल

राजेंद्र भानुदास पाटील असे या शिक्षकाचे नाव असून ते शिरपूर येथील रहिवासी आहेत. राजेंद्र यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आली होती. आपल्याला कोरोना झाला आहे, या भीतीतून राजेंद्र पाटील यांनी आत्महत्या केली.

    धुळे : कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्याने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील एका शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले आहे. या शिक्षकाने तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    राजेंद्र भानुदास पाटील असे या शिक्षकाचे नाव असून ते शिरपूर येथील रहिवासी आहेत. राजेंद्र यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आली होती. आपल्याला कोरोना झाला आहे, या भीतीतून राजेंद्र पाटील यांनी आत्महत्या केली.

    राजेंद्र यांनी तापी नदीवरील सावळदे फाटा येथून नदीत उडी घेतली. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी राजेंद्र पाटील यांची बाईक आणि डॉक्टरांची फाईल मिळून आली आहे. या घटनेमुळे शिरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. राजेंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.