भरधाव ट्रकचालकाची दुचाकीला धडक, अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू

सकाळी ८ वाजेच्या सुमारास प्रदीप पाटील हे आपले सहकारी सुनील गुलाब पाटील यांच्यासोबत मोटरसायकलने (एमएच १८- १९२३) देवपूर येथील आपल्या घरून वेल्हाणे गावी जाण्यासाठी निघाले होते. धुळे-चाळीसगाव हॉटेल फायफायसमोर भरधाव वेगाने आलेल्या ट्रक (आर.जे. २०-जी.बी. १६१८) याने मोटरसाकलला समोरुन जोरदार धडक दिली. यामुळे दोघे जण रस्त्यावर फेकले गेले आणि शिक्षक प्रदीप पाटील यांच्या अंगावर ट्रकचे चाक गेल्याने जागीच ठार झाले.

धुळे : भरधाव ट्रकचालकाने (Truck) समोरुन येणार्‍या मोटर सायकलला (Motor Cycle) सकाळी ८ वाजेच्या सुमारास धुळे – चाळीसगाव रोडवर जोरदार धडक (Accident) दिल्याने बोरविहिर येथील पाटील माध्यमिक शाळेचे शिक्षक Teacher) जागीच ठार झाले. प्रदीप नगराज पाटील (५२) रा. श्रीकृष्ण कॉलनी, देवपूर धुळे असे मयत शिक्षकाचे नाव आहे.

दि. १७ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास प्रदीप पाटील हे आपले सहकारी सुनील गुलाब पाटील यांच्यासोबत मोटरसायकलने (एमएच १८- १९२३) देवपूर येथील आपल्या घरून वेल्हाणे गावी जाण्यासाठी निघाले होते. धुळे-चाळीसगाव हॉटेल फायफायसमोर भरधाव वेगाने आलेल्या ट्रक (आर.जे. २०-जी.बी. १६१८) याने मोटरसाकलला समोरुन जोरदार धडक दिली. यामुळे दोघे जण रस्त्यावर फेकले गेले आणि शिक्षक प्रदीप पाटील यांच्या अंगावर ट्रकचे चाक गेल्याने जागीच ठार झाले. तर सोबत असलेले सुनील गुलाब पाटील (५२) रा. आधार नगर, देवपूर, धुळे हे जबर जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच मोहाडी पोलिस ठाण्यातील पथक घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मयत आणि जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवले. तसेच अपघातग्रस्त ट्रक चालकाला वाहनासह ताब्यात घेतले. या अपघाताची प्राथमिक नोंद मोहाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, शिक्षक प्रदिप पाटील यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने बोरविहिर गावात शोककळा पसरली होती.