धुळ्यात अवघ्या दोन दिवसांच्या बालकाला कोरोनाची लागण…

    धुळे : शहरात कोरोनाचा कहर सुरु असून तरुण व मध्यम वयस्कानंतर आता लहान मुलांनाही कोरोनाची लागण होत आहे . धुळे जिल्ह्यात दोन दिवसाच्या नवजात बाळाला कोरोनाची लागण झाल्याची पहिली घटना समोर आली आहे . या बालकावर शहरातील एका बालतज्ञाकडे उपचार सुरु आहेत . तर गेल्या २४ तासात ७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला . यामध्ये २७ ते ६६ वयोगटातील व्यक्तीचा समावेश आहे .

    दरम्यान धुळे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलेच थैमान घातले आहे . पहिल्या लाटेत लहान मुलांना कोरोना झाल्याची देशभरात कमी उदाहरणे होती . परंतु दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढले आहे . त्यात एका १ ९ दिवसाला कोरोना झाल्याची पहिली घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली होती . संबंधित बालकावर यशस्वी उपचार करण्यात आल्याने त्याने कोरोनावर मात केली आहे . तर धुळे शहरात दोन दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

    या बाळाला मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिड्रोम ऑफ कोविड हा आजार झाल्याचे निदान करण्यात आले आहे . या बाळावर शहरातील संगोपन बाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत . गर्भात असतांनाच बाळाला अशाप्रकारे संसर्ग होतो . बाळाला झटके येणे , बाळाला धाप लागणे यासह इतर लक्षणे दिसून येतात . रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरु होवून विविध व्याधी जडण्याची शक्यता असते , अशी माहिती बालरोग तज्ञ डॉ.अभिनय दरवडे यांनी दिली आहे .