कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रशासनाला रुग्णवाहिका सुपूर्द

  • कोरोना रुग्ण आढळल्यास कोरोना रुग्णाला मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी पोहचवणे गरजेचे असते शिंदखेडा तालुक्यात तातडीच्या सेवा पुरवण्यात अडचणी निर्माण होतातच तसेच गर्भवती महिलांना उपचार मिळावेत यासाठी मागील सरकारच्या काळात कोणतेही काम झाले नाही भाजपच्या ढोंगी आमदारांनी नेहमी दिशाभूल करण्याचे काम केले.

 संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे जिल्ह्यात तसेच शिंदखेडा तालुक्यात आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. कोरोना काळात अत्यावश्यक सेवा पुरवण्यात आरोग्य प्रशासनाला प्रचंड अडीअडचणीना सामोरे जावे लागते आहे. कोरोना रुग्ण आढळल्यास कोरोना रुग्णाला मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी पोहचवणे गरजेचे असते शिंदखेडा तालुक्यात तातडीच्या सेवा पुरवण्यात अडचणी निर्माण होतातच तसेच गर्भवती महिलांना उपचार मिळावेत यासाठी मागील सरकारच्या काळात कोणतेही काम झाले नाही भाजपच्या ढोंगी आमदारांनी नेहमी दिशाभूल करण्याचे काम केले. अशात संपूर्ण तालुक्याला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. गरज लक्षात घेता राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शिंदखेडा यांनी तालुका प्रशासनाला रुग्णवाहीका सुपूर्द केली राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे निरीक्षक धुळे जिल्ह्याच्या दोन दिवस दौऱ्यावर आहेत.

मा.संदीप दादा बेडसेंनी निरीक्षकांच्या दौऱ्याचे अवचित्त साधत रुग्णवाहिका तालुक्याच्या हितासाठी सुपूर्द केली त्यावेळी निरीक्षक अर्जुनजी टिळे साहेब, अविनाशजी आदिक साहेब, शिंदखेडा तालुक्याचे नेते संदीप दादा बेडसे, माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष डॉ कैलास ठाकरे, जनरल सेक्रेटरी अल्पसंख्याक विभाग जोसेफ अण्णा मलबारी यांच्या सह उपाध्यक्ष धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी साहेबराव मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोतीलाल पाटील, राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोंडाईचा एकनाथजी भावसार, जेष्ठ नेते आधार आबा पाटील, प्रशांत भाऊ भदाणे, रा.युवक तालुकाध्यक्ष चिराग माळी, जिल्हा युवक उपाध्यक्ष दुर्गेश पाटील,दादाभाई कापूरे, डॉ संजय कदम, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण पाटील, आमराळे ग्रा. स. भैया पाटील,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी डॉक्टर सेल डॉ शांताराम पाटील, कार्यध्यक्ष राष्ट्रवादी युवक धुळे जिल्हा कमलाकर बागले, इरफान भाई शेख, गोलू देसले, माजी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी सेल दर्पण पवार, रवींद्र माळी, यांच्यासह शिंदखेडा तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी शिंदखेडा तहसीलदार साहेबराव सोनवणे साहेब तसेच शिंदखेडा पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी सर यांच्याकडे रुग्णवाहिका सुपूर्द केली.