धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील मंगलमूर्ती नगरातील रहिवासी भिखन चिंधू वानखेडे (मृतक)
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील मंगलमूर्ती नगरातील रहिवासी भिखन चिंधू वानखेडे (मृतक)

  • पत्नीची प्रकृती बरी नसल्याने असायचे चिंताग्रस्त

धुळे (Dhule):  जिल्ह्यातील पिंपपळनेर तालुक्यातील लाटीपारा धरणात एका ७० वर्षीय वृद्धाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पिंपळनेर येथील मंगलमूर्ती नगरातील रहिवासी भिखन चिंधू वानखेडे असे मृतकाचे नाव आहे. पत्नीची प्रकृती बरी नसल्याने ते सतत चिंताग्रस्त असायचे. यामुळे त्यांनी आत्महत्या केली की, ते पाण्यात पडले याचा तपास पोलिस करीत आहे. सध्या पिंपळनेर पोलिसांनी या प्रकरणी मृत्यूची नोंद केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपळनेर येथील मंगलमूर्ती नगरमधील ७० वर्षीय भिकन चिंधु वानखेडे हे सकाळी १० वाजता आपल्या शेताकडे गेले होते; परंतु दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान त्यांचा मृतदेह लाटीपाडा धरणाच्या उजव्या कालव्यात पाण्यात तरंगताना मिळून आला. याबाबत पिंपळनेर पोलिसांना खबर देण्यात आली.
पिंपळनेर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे मृतदेह आणला असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

भिकन वानखेडे हे शेतकरी असून धरणाजवळ त्यांची शेती आहे. त्यांची पत्नी सतत आजारी असायची यामुळे ते मानसिक तणावग्रस्त होते. सदर घटनेनंतर उत्तर तपासणी करून त्यांचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे. भिकन वानखेडे यांच्या मृत्यूचे कारण समजून आले नाही. ते पाण्यात कसे पडले हे तपासाअंती समजून येईल. याबाबत पिंपळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल डी. डी. वेदे करीत आहेत.