धुळ्यात खून करून पोबारा काढणाऱ्या गु्न्हेगारास अटक, ७ वर्षांची सुनावली शिक्षा

बोरकुंड ता. जि. धुळे गोपाळ गोकुळ बनकर हा १३ जानेवारी १८ रोजी दुपारी साडे तीन वाजता पारोळ्याहून माल भरून बोरकुंड जाण्यासाठी त्याच्या ४०७  वाहन क्रमांक एम एच १८ ए ए ९५४२  ने जात असताना पारोळ्याहून काही किमी अंतर गेल्यावर समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच १९ ए ई ९७८६ रस्त्यात आडवी केली व दोघांनी वाहनात प्रवेश करून चालक गोपाळ ला ढकलून त्याच्या डोक्यावर टॉमी मारली.

    अमळनेर : धुळे जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात एक चालकाला डोक्यात टॉमी मारून गंभीर जखमी करणाऱ्या दोघं सराईत गुन्हेगारांना अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. बोरकुंड ता. जि. धुळे गोपाळ गोकुळ बनकर हा १३ जानेवारी १८ रोजी दुपारी साडे तीन वाजता पारोळ्याहून माल भरून बोरकुंड जाण्यासाठी त्याच्या ४०७  वाहन क्रमांक एम एच १८ ए ए ९५४२  ने जात असताना पारोळ्याहून काही किमी अंतर गेल्यावर समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच १९ ए ई ९७८६ रस्त्यात आडवी केली व दोघांनी वाहनात प्रवेश करून चालक गोपाळला ढकलून त्याच्या डोक्यावर टॉमी मारली.

    त्यांनंतर त्याला सीट खाली दाबून त्याच्याकडून १२०० रुपये मोबाईल हिसकावून घेतला व गाडी पारोळ्याकडे वळवून जोरात निघाले मात्र त्यातील एकाला गाडी नीट चालवता येत नव्हती म्हणून दुसऱ्याने आरोळी मारली की सुनील तुझे गाडी चलाती आती नही छोटी गाडिसे जायेंगे तेव्हढ्यात गाडी मोंढाळे हायस्कूल जवळ कंपाऊंड जवळ ठोकली गेली व फसली लोक धावत येऊ लागले त्यावेळी दोघे आरोपी पळून गेले गोपाळ ला दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात येऊन पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता.

    तपास अजितसिंग देवरे यांनी केला होता त्यात आरोपींनी वापरलेल्या ट्रक चा नंबर एम एच १९ ए ई ९७८६ नसून ते एम एच १८ ए ए ४५६३ क्रमांकाचे असून ते आरोपी अनवरखान नसिरखान पठाण रा उंदिरखेडा ता पारोळा ह मु हजाराबस्ती अलहेरा धुळे आणि सुनील भाऊराव बोरसे मूळ रा दत्ताने गव्हाणे ता शिंदखेडा ह मु मोहाडी नगर धुळे या दोघांनी घटनेच्या काही दिवसांपूर्वी नगाव ता धुळे येथून एक वॉचमनचा खून करून चोरून आणली होती असे उघडकीस आले ९ मार्च १८ रोजी आरोपींना अटक करण्यात आली होती.