नंदुरबारमध्ये ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव; नवापुरात सर्वात मोठं ‘किलिंग ऑपरेशन’

नवापूर तालुक्यातील पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांचा मृत्यू संसर्गजन्य आजाराने होत असल्याने प्रशासनाने डायमंड, परवेज पठाण, आमलिवाला वसीमसह इतर पोल्ट्री फार्मच्या चौदा पक्षांचे नमुने पुणे व भोपाळ येथील लॅबला पाठवण्यात आले होते. हा अहवाल काल शनिवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याची माहिती महसूल विभागाने दिली.

    नवापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रसार हळूहळू होत आहे. पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांचा मृत्यू ‘राणीखेत’ या आजाराने नसून ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याची पुष्टी शनिवारी सायंकाळी प्रशासनाने दिली. परंतु आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नवापुरात सर्वात मोठ्या किलिंग ऑपरेशनला म्हणजेच कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नंदुरबार येथील सर्व परिसर सील करण्यात आला असून चिकन आणि अंडी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

    नवापूर तालुक्यातील पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांचा मृत्यू संसर्गजन्य आजाराने होत असल्याने प्रशासनाने डायमंड, परवेज पठाण, आमलिवाला वसीमसह इतर पोल्ट्री फार्मच्या चौदा पक्षांचे नमुने पुणे व भोपाळ येथील लॅबला पाठवण्यात आले होते. हा अहवाल काल शनिवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याची माहिती महसूल विभागाने दिली.

    नवापूर तालुक्यातील पक्षांचे खाद्य मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन व्यावसायिकांनी साठवून ठेवले असते त्याची पूर्णपणे विल्हेवाट लावावी लागेल. त्यामुळे सर्वच पोल्ट्री फार्मवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.