CD will come Wait a while Welcoming Eknath Khadse in Dhule district
“सीडी” येणार ; काही काळ वाट पहा; धुळे जिल्ह्यात एकनाथ खडसे यांचे जंगी स्वागत

भाषण (speech) रंगविण्यासाठी काही बोलावे लागते. त्या हेतूने मी 'ईडी' (ED) लावाल, तर आम्ही 'सीडी' (CD) लावू, असे म्हटलेले नाही. सीडी लवकर जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न असेल, त्यासाठी वाट पाहावी लागेल, पण सीडी नक्की आणू. मागील पंचवार्षिकला भाजपने (BJP) सत्तेचा दुरुपयोग केला. माझा (Eknath Khadse) गेल्या चार वर्षांत विविध प्रकारे छळ केला.

धुळे : भाषण रंगविण्यासाठी काही बोलावे लागते. त्या हेतूने मी ‘ईडी’ लावाल, तर आम्ही ‘सीडी’ लावू, असे म्हटलेले नाही. सीडी लवकर जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न असेल, त्यासाठी वाट पाहावी लागेल, पण सीडी नक्की आणू. मागील पंचवार्षिकला भाजपने सत्तेचा दुरुपयोग केला. माझा गेल्या चार वर्षांत विविध प्रकारे छळ केला. आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणाचे उट्टे काढणे, त्रास देण्यासाठी प्रवेश केलेला नाही तर उत्तर महाराष्ट्रातील रखडलेले सिंचन, महामार्ग चौपदरीकरणासह विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रवेश केला आहे.

माझे विकासाला, शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी प्रवेशानंतर खडसे शनिवारी कारने धुळेमार्गे जळगावला रवाना झाले. त्यांचा सायंकाळी साडेसहानंतर पुरमेपाडा (ता. धुळे) सीमेवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, सुनील नेरकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र चितोडकर, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा व कार्यकर्त्यांच्या हस्ते पहिला सत्कार झाला.

नंतर पारोळा चौफुलीवर शहराध्यक्ष रणजीत भोसले, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत काटे, महेंद्र शिरसाट, महिला शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार झाला. स्वागतासह खडसे यांना ठिकठिकाणी शहर व ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः गराडा घातला होता.

एकनाथ खडसे म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात वीस ते पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या विकासाच्या विविध प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न असेल.