Corona patient's body exhumed from garbage truck; Three thirteen of the health system in Dhule

कोरोना नियमाप्रमाणेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. ग्रामपंचायतीकडून ऍम्ब्युलन्स येत आहे असे सांगण्यात येत होते. मात्र, दहा १० तास प्रतिक्षा करुनही ऍम्ब्युलन्स काही मिळाली नाही. शेवटी ग्रामपंचायतीच्या कचरा गोळा करायच्या गाडीत ठाकूर यांची अंतयात्रा काढण्यात आली .

    धुळे : राज्यभरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यातच कोरोना मृतदेहाची अहवला होत असून कचऱ्यासारखी हालत झाली आहे. कोरोना रुग्णाच्या मृतदेहाची अंत्ययात्रा घंटा गाडीतून काढल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात उघडकीस आला आहे.

    सामोडे गावातील त्र्यंम्बक विष्णू ठाकूर ( वय ७०) या व्यक्तीचा रात्री दोनच्या सुमारास कोरोनामुळे मृत्यू झाला. ठाकूर कोरोना पॉसिटीव्ह होते. मात्र, या दरम्यान त्यांचा अचानक मृत्यू झाला. रात्री त्यांच्या मृत्यूची माहिती ग्रामपंचायतीला दिली गेली.

    कोरोना नियमाप्रमाणेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. ग्रामपंचायतीकडून ऍम्ब्युलन्स येत आहे असे सांगण्यात येत होते. मात्र, दहा १० तास प्रतिक्षा करुनही ऍम्ब्युलन्स काही मिळाली नाही. शेवटी ग्रामपंचायतीच्या कचरा गोळा करायच्या गाडीत ठाकूर यांची अंतयात्रा काढण्यात आली .

    निवडक नातेवाईकांनी पीपीई किट घालून कचरा गाडीतून त्र्यंबक ठाकूर यांचा देह स्मशानभूमीत नेला आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.