Dhule RTO action against bullet riders

बुलेटस्वारांना धुळे RTO चा जबरदस्त दणका दिला आहे. धुळे शहरातील बुलेट मोटर सायकल धारक यांनी बुलेटला कंपनीने दिलेले सायलेन्सर ऐवजी मॉडीफाईड कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवले. या सायलेन्सरच्या माध्यमातून शहरात ध्वनी प्रदुषण करणाऱ्या २९ बुलेट धारकांवर मोटर वाहन कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे. मॉडीफाईड कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर धुळे शहर वाहतुक शाखेने रोड रोलर फिरून अनोखी कारवाई केली आहे. 

    धुळे : बुलेटस्वारांना धुळे RTO चा जबरदस्त दणका दिला आहे. धुळे शहरातील बुलेट मोटर सायकल धारक यांनी बुलेटला कंपनीने दिलेले सायलेन्सर ऐवजी मॉडीफाईड कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवले. या सायलेन्सरच्या माध्यमातून शहरात ध्वनी प्रदुषण करणाऱ्या २९ बुलेट धारकांवर मोटर वाहन कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे. मॉडीफाईड कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर धुळे शहर वाहतुक शाखेने रोड रोलर फिरून अनोखी कारवाई केली आहे.

    शहरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेट चालकांसंदर्भात वाहतूक शाखेकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांच्या सायलेन्सर वर वाहतूक शाखेने रोड रोलर फिरवत चांगलाच दणका दिला आहे. या पुढे देखील फॅन्सी नंबरप्लेट आणि कर्कश हॉर्न आणि सायलेन्सर अशीच कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस अधिकारी संगीता राऊत यांनी दिली.

    बुलेटच्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवला – पाहा व्हिडिओ