Police officer Chinmay Pandit
धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित

  • प्रकृती चिंताजनक नसल्याची दिली माहिती

धुळे (Dhule). धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित हे स्वत: कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यावर मालेगाव रोडवरील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़. त्यांची प्रकृति उत्तम असल्याची माहिती त्यांनी स्वत: माध्यमांशी बोलताना दिली़. पोलीस अधीक्षक पंडित यांची गेल्या दोन दिवसांपासून प्रकृति अस्वस्थ होती़.

त्यांनी स्वत:च्या आरोग्याची तपासणी करुन घेतल्यामुळे त्यांचा अहवाल हा रविवारी पॉझिटिव्ह आला़. त्यांनी त्यांच्यासोबत असलेला बॉडीगार्ड आणि वाहन चालक यांचीही तपासणी करुन घेतली़. सुदैवाने ते दोघेही निगेटिव्ह आले आहेत़. दरम्यान, चिन्मय पंडित यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती उत्तम आहे़. डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत़.