Farmers demand immediate compensation

चारा पिकांचे प्रचंड नुकसानझाले आहे. बाजरी पण काळवंडली असून ज्वारीपण त्याच मार्गावर आहे. आता चांगले होण्याच्या मार्गावर असलेले शेतशिवार रस्ते अजून एक महिना आता दुरुस्त होणार नाहीत. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा त्वरित प्रशासनाने पंचनामे करून शेतकरी बांधवाना योग्य तो मोबदला मिळवून द्यावा.

धुळे : दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीतून सावरत नाही, तोच सोमवार- मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे (Rain) पुन्हा एकदा खरिपाच्या पिकांना फटका बसून पिके भुईसपाट झालेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers ) हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा त्वरित प्रशासनाने पंचनामे करून शेतकरी बांधवाना योग्य तो मोबदला (compensation ) मिळवून द्यावा. अशी मागणी शेतकरी करत आहेत.

येथे शनिवार ते मंगळवार संध्याकाळी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे फायदा कमी नुकसानच जास्त झाले शेतीचा हंगाम ऐन भरात असताना ,अचानक आलेल्या परतीच्या पावसाने मोहाडी सह परिसरातील गावांमध्येही शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात वेचण्यासाठी तयार असलेल्या बागायती तसेच कोरडवाहू कापूस (cotton crops)  झाडावर ओला होऊन बोंडे अक्षरश: लोंबकळून जमीनदोस्त झाली. तसेच काढणीला आलेल्या भुईमुगाच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. पक्व झालेल्या शेंगांचे आता कोंब फुटूनवर येऊ लागतील. तिळीचे पीक पण पाण्यातच गेले आहे. आधीच मूग, उडीद आदी कडधान्य खराब झाले.

चारा पिकांचे प्रचंड नुकसानझाले आहे. बाजरी पण काळवंडली असून ज्वारीपण त्याच मार्गावर आहे. आता चांगले होण्याच्या मार्गावर असलेले शेतशिवार रस्ते अजून एक महिना आता दुरुस्त होणार नाहीत. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा त्वरित प्रशासनाने पंचनामे करून शेतकरी बांधवाना योग्य तो मोबदला मिळवून द्यावा.

दुसाणे, साक्री तालुक्यातील दुसाणे व आजूबाजूच्या परिसरात २१ सप्टेंबर रोजी तसेच मंगळवारी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. त्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा अगदी तोंडाशी आलेला घास जमीनदोस्त झाला. यात कांदा,कापूस, ज्वारी,बाजरी या पिकांचे खूप नुकसान झाले. बाजरी व ज्वारी काढणीची वेळ आली होती. परंतु अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याची एकच तारांबळ उडाली. कापूस वेचणीच्या कामाला वेग आला होता, परंतु सर्व कापूस देखील गळून गेला. उर्वरित कापसाच्या झाडावरचे संपूर्ण बोंड वादळामुळे गळून पडली आहेत. तसेच फळबागेत पपई, अ‍ॅपल बोर , ऊस , केळी याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याला तारणहार ठरणारे गवार पिकाच्या शेवटच्या तोडणी बाकी होत्या. ते पीक देखील पूर्णत: वाया गेले. तर या पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस शनिवारी झाला. या पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला होता. वादळामुळे काही ठिकाणी विजेचे तार तुटून पडल्यामुळे परिसरात वीज पुरवठा खंडीत झालेला होता.

दरम्यान नुकसान झालेल्या पिकांचे महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.