First the bike was blown up then ... the driver didn't know what happened; I was shocked to see an ST bus driver driving on the Aurangabad-Dhule route

रस्त्यातच बसच्या चेसिसच बोल्ट निखळला आणि चाके एका दिशेने आणि बॉडी दुसऱय दिशेने धावायला सुरुवात झाली परिणामी बसचा तोल जाऊन वेडीवाकडी चालायला लागली रस्त्यावरील अनेकांच्या हा प्रकार लक्षात आला, मात्र चालकाल त्याचे गांभीर्य कळले नाही. बस सुरुवातीला एका दुचाकीस्वाराल हुलकावणी दिल्यानंतर दुचाकीचालकाला नेमके काय झालेय हे लक्षात आले, परंतु तरीही त्याने बस सुसाट दामटली दुचाकीचालकाने मोबाइलमधुन चित्रीकरण सुरू केले.

    औरंगाबाद : पडेगाव रस्त्यावरून धुळ्याच्या(Dhule) दिशेने वेडीवाकडी एसटी चालवली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. औरंगाबाद बस स्थानकातून धुळ्याला जाणारी बस काही अंतर गेल्यावर ती बस वेडीवाकडी सुसाट वेगाने चालविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी संध्याकाळी समोर आली. या बसच्या धक्क्याने एक दुचाकीचालक जखमी झाला होता. बसमधील २९ प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या त्या बसचालकाविरोधात छावणी पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

    गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी येथील साहेबसिंग भाऊसिंग कवाळे (५५) हे या बसच्या धडकेत जखमी झाले. मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेत पागरपत्रक जमा करण्यासाठी ते जात होते. एसटी बसचालक दीपक रमेश पाटील (३८, रा. फागणे, ↑ ता. जि. धुळे) हे बस (एमएच न १४ डीटी २११९) घेऊन दुपारी तीन वाजता औरंगाबाद बसस्थानकावरून धुळ्याकडे निघाले होते.

    रस्त्यातच बसच्या चेसिसच बोल्ट निखळला आणि चाके एका दिशेने आणि बॉडी दुसऱय दिशेने धावायला सुरुवात झाली परिणामी बसचा तोल जाऊन वेडीवाकडी चालायला लागली रस्त्यावरील अनेकांच्या हा प्रकार लक्षात आला, मात्र चालकाल त्याचे गांभीर्य कळले नाही. बस सुरुवातीला एका दुचाकीस्वाराल हुलकावणी दिल्यानंतर दुचाकीचालकाला नेमके काय झालेय हे लक्षात आले, परंतु तरीही त्याने बस सुसाट दामटली दुचाकीचालकाने मोबाइलमधुन चित्रीकरण सुरू केले. इतर वाहनचालक तिला थांबवण्याच्य प्रयत्नात असतानाच बस रस्त्याच्या कडेने जात असलेल्य कवाळे यांना मागून धडक दिली कवाळे रस्त्यावर कोसळल्यानंतर चालकाने बस थांबवली, हेल्मेट परिधान केलेले असल्याने कवाळे सुरक्षित राहिले. या प्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार के. बी. काळे करीत आहेत.

    धुळ्यातील एसटी चालकाची खरतनाक ड्रायव्हिंग – पाहा व्हिडिओ