कार विहीरीत पडल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा बुडून मृत्यू

दुसाने येथे विवाह सोहळा आटोपून दिघावे येथे जाणाऱ्या दाभाडी येथील एका कुटुंबाची चार चाकी वाहन कासारे गणेश पुर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याने चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एक जणाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.

    साक्री (जि. धुळे) : तालुक्यातील दुसाने येथे विवाह सोहळा आटोपून दिघावे येथे जाणाऱ्या दाभाडी येथील एका कुटुंबाची चार चाकी वाहन कासारे गणेश पुर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याने चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एक जणाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.

    हे सर्व कुटुंब दिघावे येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना हा अपघात झाला आहे गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्या लगत असलेल्या विहिरीत हि कार कोसळली आहे घटनास्थळी कासार येथील ग्रामस्थांनी मदत पुरवली आहे मृतांमध्ये एक महिला व तीन मुलांचा समावेश आहे