maharashtra corona cases

  • धुळ्यातील सरकारी कोरोना टेस्टींग लॅबवर संपूर्ण खानदेशचा म्हणजेच नाशिक. मालेगाव. नंदुरबा,जळगाव. धुळे या जिल्ह्यांचा भार होता. या जिल्ह्यातील कोरोना नमुने धुळ्यातील लॅबवर तपासणीस पाठवायचे त्यामुळे खुप भार झाला होता. अहवाल मिळण्याचा कालावधी लांबला होता तो आता पुन्हा कमी केला आहे. यामुळे ल्रॅबमधील २ डॉक्टर आणि ८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने लॅब मधील अहवालाची प्रतिक्रिया संथ गतीने झाली होती. आता ती पुन्हा सुरळीत झाली आहे.

धुळे – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोरोना चाचणींची संख्या देखील वाढवीली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्हांतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. धुळ्यातही कोरोना चाचणींची संख्या वाढवल्याने जिल्ह्यातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एकमेव कोरोना टेस्टिंग लॅबवर फार भार आला आहे. हा मुद्दा लक्षात घेत भार कमी करण्यासाठी प्रशासनाने खासगी लॅबसह करार करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आयसीएमआर च्या नीकषांनुसार पुण्यातील खासगी लॅबला धुळ्याती कोरोना अहवाल चाचणीची परवानगी दिली आहे. आणि इतर दोन लॅबसोबत करोर करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे.

धुळ्यातील सरकारी कोरोना टेस्टींग लॅबवर संपूर्ण खानदेशचा म्हणजेच नाशिक. मालेगाव. नंदुरबा,जळगाव. धुळे या जिल्ह्यांचा भार होता. या जिल्ह्यातील कोरोना नमुने धुळ्यातील लॅबवर तपासणीस पाठवायचे त्यामुळे खुप भार झाला होता. अहवाल मिळण्याचा कालावधी लांबला होता तो आता पुन्हा कमी केला आहे. यामुळे ल्रॅबमधील २ डॉक्टर आणि ८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने लॅब मधील अहवालाची प्रतिक्रिया संथ गतीने झाली होती. आता ती पुन्हा सुरळीत झाली आहे. 

धुळ्यातील कोरोना टेस्टींग लॅबमध्ये कोरोना नमुने गेल्यास त्यांचा अहवाल २ ते ३ दिवसांनी भेटत होता. परंतु हा अहवाल लवकर भेटण्यासाठी प्रशासनाने खासगी लॅबसह करार केला आहे. यामुळे शासकीय लॅबवरील भार कमी झाला आहे.