लाच स्वीकारताना ग्रामसेविकेला अटक

धुळे (Dhule).  जिल्ह्यातील सोनेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका पूनम प्रकाश ठाकरे यांना १६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. यामुळे सोनवाडीत एकच खळबळ उडाली. या प्रकरणात तक्रार करणारा खासगी ठेकेदार आहे. त्याने गावात दोन घर, सात शौचालये आणि एक भूमिगत गटारीची निर्मिती केली होती.

सदर बांधकामाच्या खर्चाची रक्कम चेकद्वारे देण्यासाठी आरोपी वैशाली ठाकरे यांनी ठेकेदारास १६ हजार रुपयांची लाच मागितली. ठेकेदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अखेर सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली. या कारवाईसाठी धुळे ब्युरोचे पोलिस उप अधीक्षक सुनील कुराडे यांच्या निर्देशना अंतर्गत पोलिस निरीक्षक मनजितसिंग चव्हाण, सुधीर सोनवणे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चैधरी, भूषण खलाणेकर यांनी कारवाई केली.