Corporator Shital Navale
नगरसेवक शीतल नवले त्यांच्या समर्थकांसोबत ठिय्या आंदोलन करताना

  • नगरसेवक शीतल नवले यांचा संताप

धुळे (Dhule). माझे आरोप खोटे निघाल्यास मी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच फाशी घेईल असे आव्हान नगरसेवक शीतल नवले (Corporator Sheetal Navale, Dhule)  यांनी धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलत करीत असतांना केले. धुळे महापालिकेतील प्रशासन नगरसेवकांना कचऱ्याच्या काडीचीही किंमत देत नाही.तसेच प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे विकास कामांना वेळ मिळत नसल्याने नागरिकांचा रोष नगरसेवकांना सहन करावा लागत असल्याचा आरोप करीत नगरसेवक शीतल नवले यांनी धुळे महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करीत प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे.

धुळे महापालिकेतील प्रभाग क्रमांक १७ चे नगरसेवक शितल नवले यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच ठिय्या आंदोलन केले.शीतल नवले हे स्वतः सिव्हिल इंजिनिअर असून शहराला नियमित पाणीपुरवठा कसा सुरळीत करता येईल याचा आराखडा त्यांनी तयार करून महासभेत सोपविला होता. मात्र त्यावरही आयुक्तांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. प्रशासनाच्या आडमुठे धोरणाविरोधात शितल नवले यांनी पुकारलेल्या आंदोलनाने सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं.

प्रशासनाविरुद्ध केलेल्या आरोपांमध्ये कुठलीही खोटी माहिती आढळून आल्यास मी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच फाशी घेईन असा इशारा शितल नवले यांनी प्रशासनाला दिला आहे यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच महापौर चंद्रकांत सोनार यांनी त्यांची भेट घेऊन हे प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालू असे आश्वासन त्यांनी यावेळी शितल नवले यांना दिले मात्र जोवर याठिकाणी आयुक्त येत नाही तोवर हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा शितल नवले यांनी घेतला आहे.

गेल्या दीड वर्षापासून धुळे शहरातील सार्वजनिक शौचालयाची प्रचंड दुरवस्था झाली असून प्रशासनाला वारंवार सांगून देखील ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.धुळे महानगरपालिकेत भाजपची एक हाती सत्ता आल्यानंतर विकास कामांना वेग मिळेल आणि त्यातून शहराचा कायापालट होईल असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत होता. मिल कामगारांचा असलेल्या प्रभात तसेच मुस्लिम परिसरातील शौचालयांची प्रचंड दुरावस्था झाली आहे यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून परिसरात घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे आयुक्तांनी ठेकेदारांचे कोट्यावधींची बिले काढून दिलेत मात्र शौचालयांच्या दुरुस्तीसाठी निधी दिलेला नाही.

आयुक्तांनी त्यांचे हितसंबंध आतील ठेकेदारांचे करोडो रुपयांची बोगस जुने बिले काढून दिली मात्र त्यापैकी एकही काम अद्याप पूर्ण झालेले नाही भर उन्हाळ्यात प्रशासनाकडून हेतुपुरस्कर अनियमित पाणीपुरवठा केला जातो याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात अशा एक ना अनेक समस्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नगरसेवक शितल नवले यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलनाला सुरुवात केली आहे.