बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, धुळ्यात भाजप महानगरची निदर्शने

भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशानुसार महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले.पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर उसळलेल्या दंगलीत तृणमुलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या चिथवणीने तृणमुल कार्यकर्ते आणि गुंडांनी केलेल्या हिसांचारात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना जीव गमवावा लागला.त्यांची घरे आणि मालमत्ता जाळण्यात आली.

    धुळे : पश्चिम बंगालमध्ये तृणमुल कॉंग्रेस हा गुंडांचा पक्ष आहे. बंगालमध्ये भाजपाने मिळालेला जनादेश मान्य केला असला तरी तृणमुल मात्र सत्तेच्या मस्तीत आहे. भाजपा कार्यकर्त्यांवर खूनी हल्ले होत आहे.तेथे खूनी खेळ खेळला जात आहे.त्यामुळे बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी खा.डॉ.सुभाष भामरे यांनी केली आहे. बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा धुळे महानगर भाजपतर्फे तिव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

    भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशानुसार महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले.पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर उसळलेल्या दंगलीत तृणमुलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या चिथवणीने तृणमुल कार्यकर्ते आणि गुंडांनी केलेल्या हिसांचारात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना जीव गमवावा लागला.त्यांची घरे आणि मालमत्ता जाळण्यात आली.

    भाजपच्या अशा कार्यकर्त्यांकडून आणि टीएमसीच्या गुंडांचा धिक्कार करण्यासाठी धुळ्यातील राजवाडे चौकात आंदोलन करण्यात आले.भारतीय लोकशाहीला काळीमा फासणार्‍या या कृत्याचे धनी असणार्‍या ममता बॅनर्जी यांनी आपल्या गुंडांना त्वरीत आळा घालावा अन्यथा तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी देखील आंदोलन कर्त्या भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे देशातील जनमानसात आणि भाजपमध्ये संतापाची भावना असून भाजप कार्यकर्ते गुंडगिरीला न घाबरता अधिक जोमाने काम करतील असे खा.डॉ.भामरे म्हणाले.