धुळ्याचे नुतन जिल्हाधिकारी जलज शर्मा

    धुळे : जिल्हाधिकारी संजय यादव यांची बदली झाली असून त्याच्या जागी नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांची नियुक्त करण्यात आली आहे. मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या बदलीबाबत रात्री उशिरापर्यंत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान २०१४ च्या तुकडीचे अधिकारी असलेले शर्मा हे आयएएस परीक्षेत देशात ४३ व्या स्थानावर होते.

    मुळचे चंदीगढ येथील रहिवासी असलेले शर्मा हे २०११ मध्ये आयआरएस झाले होते. त्यानंतर त्यांनी परत युपीएससीची परीक्षा दिली. यात ते आयएएस म्हणून निवडले गेले. नागपूरचे अतिरिक्त आयुक्त म्हणून ते कामकाज पाहज होते. त्यांची धुळे जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    दरम्यान जिल्हाधिकारी संजय यादव यांची एप्रिल २०२० मध्ये धुळे जिल्ह्यात नियुक्ती झाली होती. दीड वर्षाच्या आतच त्यांची बदली झाली आहे. दरम्यान कोरोना हाताळण्यात त्यांनी उत्कृष्ठ काम केले. त्यांच्या नियोजनामुळे जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. याबरोबरच कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठीही त्यांची वेळोवेळी आढावा घेवून मदतीसाठी प्रयत्न केले.