The applause, the clapping of hands, the lighting of the lamps did not go away, but increased; Jayant Patil slammed the BJP

राज्यभरात राष्ट्रवादीची परिसंवाद यात्रा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यभरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. मात्र, जयंत पाटील कार्यक्रमासाठी आले असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले आहेत. जयंत पाटील यांच्या समोरच कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. धुळ्यामधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील यांच्यासमोरच पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

    धुळे : राज्यभरात राष्ट्रवादीची परिसंवाद यात्रा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यभरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. मात्र, जयंत पाटील कार्यक्रमासाठी आले असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले आहेत. जयंत पाटील यांच्या समोरच कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. धुळ्यामधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील यांच्यासमोरच पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

    जयंत पाटील हे धुळे येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले होते. यावेळी अनिल गोटे यांचे समर्थक असलेले भूषण पाटील हे भाषणासाठी उभे राहीले असताना त्यांचे कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादास सुरुवात झाली. बघता बघता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि जयंत पाटील यांच्या समोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले.

    या प्रकारामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न करत केला. जयंत पाटील हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यव्यापी दौरा करत आहेत. मात्र, धुळ्यात घडलेल्या या प्रकारामुळे कार्यकर्त्यांची नाराजी उघड झाली आहे. या हाणामारीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.