दारु विक्रेत्यांनी गड किल्ल्यांवरच बनविला हातभट्टीचा अड्डा; व्हिडिओ हाती लागताच पोलिसांनी टाकली धाड

    धुळे (Dhule) : शहराजवळील लळिंग किल्ला (Laling Fort) येथे हातभट्टी सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर viral झाला (viral on social media) होता. या माहितीच्या आधारे मोहाडी पोलीस ठाण्याचे (Mohadi police station) पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे (police inspector Dattatraya Shinde) यांना कारवाईबाबत विचारणा केली असता, त्यांनी ह्या व्हिडिओची तात्काळ दखल घेत या ठिकाणी जाऊन हातभट्टीची दारू उद्धवस्त केली. (smashed the liquor)


    एकीकडे गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत असताना दुसरीकडे मात्र त्याच गड-किल्ल्यांवर अवैध व्यवसाय सर्रासपणे सुरू आहेत यावर वनविभाग आणि पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. हा दारूचा अड्डा कोणाचा होता याचा तपास मोहाडी पोलीस करीत आहे.